शिवचरण उज्जैनकर यांना मानद डॉक्टरेट

भुसावळ – माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे पतपेढीचे संचालक शिव चरण उज्जैनकर सर यांना नुकतीच ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी अमेरिकेने यांच्या 24 वर्षाच्या समाजकार्यामध्ये मानद डॉक्टरेटजाहिर केले असून मॅगसेसे पुरस्कार विजेत्या तथा पद्मश्री नीलिमाताई मिश्रा यांच्या हस्ते तथा केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंद दहिवले यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले .

त्याच प्रमाणे उज्जैनकर यांना नुकतीच साउथ अमेरिकेची मास कम्युनिकेशन मध्ये सुद्धा मानद डॉक्टरेट जाहीर झाल्याबद्दल उज्जैनकर यांचा पतपेढीचे अध्यक्ष श्री ललित सुपे सर सेक्रेटरी सौ रेखा चौधरी मॅडम उपाध्यक्ष श्री प्रशांत नरवाडे सर
माजी अध्यक्ष श्री जी. बी. पाटील सर श्री डी. ए. पाटील सर श्री संजु भटकर सर श्री यशवंत महाजन सर श्री शशिकांत मोरे सर श्री सुशीलकुमार झोपे सर आदी पदाधिकाऱ्यांनी शाल व बुके देऊन सत्कार केला
याप्रसंगी पतपेढीचे अधीक्षक श्री प्रमोद पाटील व सर्व कर्मचारी वृंद
उपस्थित होते प्रसंगी उज्जैनकर यांच्या कार्याचा सर्वांनी गौरव केला.