यावल – तालुक्यातील मालोद येथे पावसात घराची भिंत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत एका 4 वर्षीय कि चिमूकल्याचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना येथे घडली आहे .
यावल तालुक्यातील मालोद या आदीवासी गावात आज दिनांक २५ जुलै रवीवार रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ईमाम दगडु तडवी यांच्या घरातील मातीची भिंत ही जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे अचानक कोसळली यावेळी घरात खेळत असलेला आबीद इमाम तडवी वय 4 वर्ष यांच्या अंगावर ती भिंत कोसळली यात त्याचा जागीच मृत्यु झाला . गावातील नागरीकांच्या मदतीने कोसळलेल्या भिंतीच्या ढीगाऱ्याखालून बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला , मालोद गावात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली . दरम्यान बालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ . शुभम तिळके यांनी केले . मयत बालकाचे वडील इमाम दगडु तडवी यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे .



