भुसावळ खून प्रकरण : आरोपी मुन्ना चौधरीला पाच दिवसांची पोलिस कोठडी –


भुसावळ –
वाढदिवसाच्या पार्टीतच वाद झाल्याने लोखंडी पावडा व धारदार शस्त्राने वार करून मित्रानी सचिन ज्ञानदेव भगत (32, श्रद्धा नगर, भुसावळ) या तरुणाचा खून झाला होता.ही घटना जामनेर रोडवरील गजानन महाराजांच्या मंदिरासमोर शुक्रवारी मध्यरात्री घडली होती. या प्रकरणी आरोपी प्रशांत उर्फ मुन्ना चौधरी यास अटक करण्यात आली असून आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, खून प्रकरणी अन्य दोन पसार आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणी त्याची पत्नी सपना भगत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी मुन्ना चौधरी, राहुल कल्ले, जितू पावरा व अन्य इसमाविरोधात बाजारपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.