भुसावळ (प्रतिनिधी )-
छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील आर्थिक मागास कुटुंबियामध्ये जास्तीत जास्त कोरोना लसीकरण व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून येथील गरजू कुटूंब ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे अश्या कुटुंबाना, ग्लोबल ह्यूमन प्रोटेकशन अँड डेव्हलपमेंट फौंडेशन यांच्या सौजन्याने ५ किलो गहू,५ किलो तांदुळ दिले जाईल असे आवाहन अॅड.अभिजीत अजय मेने कायदे आघाडी शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांनी केले आहे.

सदर योजने चा लाभ घेणेसाठी लसीकरण चे प्रमाणपत्र,रेशन कार्ड,आधार कार्ड अॅड.अभिजीत अजय मेने यांचे छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील संपर्क कार्यालयात जमा करावे. आर्थिक मागासवर्गीय कुटुंबाना लस घेणेसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून सदर उपक्रम राबविन्यात येत असल्याचे अडँ. अभिजित अजय मेने. 9922239800 यांनी कळविले आहे .


