भुसावळ भाजपाचे जोरदार निदर्शने – 12 आमदारांचे निलंबन मागे घ्या – एकमुखी मागणी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भारतीय जनता पार्टी शहर तर्फे शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावसुली आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन करण्यात आल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व निदर्शने करून प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन सदरील घटने बद्दल रोष व्यक्त करण्यात आला
निर्दशनात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी,जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा चिटणीस शैलेजाताई पाटील,कायदे आघाडी जिल्हा अध्यक्ष ऍड प्रकाश पाटील, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे,अमोल महाजन,जेष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे,प्रा दिनेश राठी, गिरीश महाजन, खुशाल जोशी, राजु खरारे, बिसन गोहर, जयंतीलाल सुराणा,चंद्रशेखर इंगळे, सुरेश कुटे,दिलीप कोळी, संजय बोचरे, मुकंदा निमसे, पवन बुंदेले, प्रशांत निकम, मनोज पिंपळे, प्रविण इखणकर,रवी दाभाळे, पंकज जैन,चेतन बोरोले, अजय बऱ्हाटे,युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी,नंदकिशोर बडगुजर, गोपिसिंग राजपूत , राहुल मेहरानी , लखन रणधिर, नागेश खरारे , प्रशांत भट, प्रणव डोलारे, लोकेश जोशी, अक्षय जाधव , मयुर सावकारे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *