भुसावळात क्रीडा संकुल कामासाठी तातडीने काढावी निविदा – भुसावळात आमदार संजय सावकारेंच्या आढावा बैठकीत सूचना : निविदा न काढल्याने विचारला जाब –


भुसावळ –

शहरातील तालुका क्रीडा संकुलासाठी निधी मंजूर केल्यानंतरही निविदा का काढण्यात आली नाही? असा प्रश्‍न आमदार संजय सावकारे यांनी उपस्थित केला. क्रीडा संकुलासंदर्भात आमदारांच्या उपस्थितीत शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक झाली. या संदर्भात तातडीने पुढील प्रक्रियेला सुरवात करण्याच्या सूचना आमदारांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत, तहसीलदार दीपक धीवरे, गटविकास अधिकारी विलास भटकर, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, बांधकाम विभागाचे एस.यु.कुरेशी आदी उपस्थित होते.

तांत्रिक मान्यता घेण्याच्या सूचना
गत टर्ममध्ये भुसावळ तालुका क्रीडा संकुलासाठी सात कोटी 92 लाख रुपयांचा निधी मंजूर असून त्यास दोन वर्षांपेक्षा अधिक काळ होऊनही निविदा का निघाली नाही? असा प्रश्‍न आमदारांनी उपस्थित केला. या कामाला प्रशासकिय मान्यता मिळाली असून आता तांत्रिक मान्यतेचा प्रश्न आहे. या मान्यतेसाठी संबधीत कंन्सलंटच्या माध्यमातून नाशिक येथून मान्यता घ्यावी, तसेच तातडीने कामाची निविदा काढावी, अशा सूचना आमदार संजय सावकारे यांनी बैठकीत केल्या. तालुका क्रीडा संकूलासाठी यापूर्वी एक कोटी रुपयांचा निधी वापरुन काम करण्यात आले आहे, मात्र पुढील कामे थांबल्याने संकूलाची वाताहत झाली आहे. यामुळे तातडीने निविदा प्रकाशित करावी, अशी चर्चाही या बैठकीत झाली.

कामे होत नसल्याने आढावा घेतला : आमदार
तालुका क्रीडा संकुलासाठी निधी मिळून दोन वर्ष झाली पण कामे होत नसल्याने आज बैठक घेवून आढावा घेतला. या संदर्भात यापूर्वी याच विषयावर जिल्हाधिकारी व राज्यमंत्र्यांकडेही बैठक झाली असून गेल्या काळात राज्यात केवळ चंद्रपूर व भुसावळला अधिक निधी मिळाल्याचे आमदार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *