भुसावळ (प्रतिनिधी )-
कुऱ्हे पानाचे शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक शिवसेना, नेत्रम हॉस्पिटल आणि श्री रिदम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील नागरिकांसाठी आरोग्यसेवा अभियान राबवण्यात आले. शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आरोग्य सेवा अभियानात १२४ नागरिकांची हाडांचे आजार, बालरोग, मधुमेह, दातांचे आजार, शल्य चिकित्सा तपासणी, ब्लड प्रेशर, मधुमेह, इतर व्याधीसह संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, कार्यलयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, सरपंच जीवन पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शहरप्रमुख निलेश महाजन, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, कविता सपकाळे, शेख इलियास, उपसरपंच विकास रंदाळे, किशोर पाटील, जितेंद्र नागपुरे, सचिन सोनार, गजानन पाळोदे, सुनील जैन, कैलास जाधव, निलेश ठाकूर, विजेंद्र कोळी, प्रमोद परदेशी उपस्थित होते.
श्री रिदम हॉस्पिटलचे डॉ. सय्यद आणि नेत्रम हॉस्पिटलचे डॉ.सुनील मेश्राम यांनी सहकार्य केले.



