महाराणा प्रताप विद्यालय व अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथील विद्यार्थी विद्यार्थ्यीनीची राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेसाठी निवड –

भुसावळ –
येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाच्या महाराणा प्रताप विद्यालयाचा विद्यार्थी निषाद मधुकर R tr huYTTRचौधरी व अहिल्यादेवी कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी कु. गौरी काशीराम बारेला यांची राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेसाठी निवड झालेली आहे. डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षे मध्ये या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. निषाद मधुकर चौधरी या विद्यार्थ्याला १४९ गुण मिळाले. ओ.बी.सी. संवर्गात ११७ वा क्रमांक त्याला मिळालेला आहे. तसेच गौरी काशीराम बारेला हिला ११४ गुण मिळाले. एस.टी. संवर्गात तिचा ५८ वा क्रमांक आहे.

सदर विद्यार्थ्यांना दहावीच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सोनु मांडे, सचिव श्रीमती उषाताई पाटील तसेच बापूसाहेब मांडे दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक8 मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षकांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *