नवीन बस स्टॅन्ड परिसरात जनमत प्रतिष्ठान तर्फे बस कर्मचाऱ्यांचा सत्कार ; तीसरी लाट टाळण्यासाठी जनजागृती ;

जळगाव –

जनमत प्रतिष्ठान तर्फे आज १२ जून शनिवार नवीन बस स्टॅन्ड मध्ये कारोना काळामध्ये काम करणारे कर्मचारी त्यातही डेपो मॅनेजर प्रथमेश बोरसे, निलेश पाटील आगर व्यवस्थापक, माणूस तिवारी आगारप्रमुख,, मनोहर मिस्तरी वाहन परीक्षक, सारिका वैद्य वरिष्ठ लिपिक, रत्ना भोई लिपिक, यांना सन्मानपत्र व फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर तीसरी लाट येवू नये याकरीता नागरिकांनी खबरदारी घेत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी मास्क वापरा, साबणाने हात धुवा , गर्दी टाळा असा संदेश देण्यात येवून जनजागृती करण्यात येत आहे .तसेच पूर्ण बस स्टँड च्या आवारामध्ये व बसेस वर मास्क लावा व सुरक्षित अंतर ठेवा असे फलक लावण्यात आले, प्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे विजय लुळे, ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे हर्षल पाटील सागर कोळी, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *