कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबास ७० हजारांचा धनादेश ; गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या कर्मचाऱ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी ;

भुसावळ –
कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीतील कार्यशाळा निर्देशक स्व.भीमराव खोब्रागडे यांच्या कुटुंबातील सदस्यांना महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे मिळून आर्थिक सहाय्य करतांना ७०००० रुपयांचा धनादेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे डीन डॉ.राहुल बारजिभे, डॉ.सुधीर ओझा, डॉ.गिरीष कुळकर्णी, प्रा.अजित चौधरी, डॉ.दिनेश पाटील, डॉ.गजानन जाधव, कार्यशाळा निर्देशक शिवाजी बरकले, संजीव नगरे उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण:
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वृंदानी एकत्रितपणे ही मदत केली असून गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण दर्शविले आहे. स्व. खोब्रागडे यांच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी सहाय्य करण्याच्या प्रयत्न केला आहे असे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *