जळगाव जिल्ह्यात आजची कोरोनाची अधिकृत आकडेवारी आनंदाची बातमी ! संशोधकांना कोरोनावर औषध सापडलं ; 48 तासांमध्ये संपवलं व्हायरसला ;

जळगाव जिल्ह्यात आजची कोरोनाची अधिकृत आकडेवारी
आनंदाची बातमी ! संशोधकांना कोरोनावर औषध सापडलं ; 48 तासांमध्ये संपवलं व्हायरसला

जळगाव :
जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात १५८ रुग्ण आढळून आले आहे. तर आज ६२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात ४ जणांचा बळी गेला आहे.

जळगाव जिल्ह्यात मागील महिन्यापासून नव्या बधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणत घटली आहे.

आज आढळून आलेल्या रुग्णांनंतर जिल्ह्यातील एकूण बधितांचा आकडा १,४०,६०४ वर पोहचला आहे.त्यापैकी १,३४,२२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर मृताचा एकूण आकडा २५४८ वर गेला आहे.जिल्ह्यात सध्या ३८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर -१८, जळगाव ग्रामीण- ३, भुसावळ-७, अमळनेर-१, चोपडा-२, पाचोरा-४, भडगाव-७, धरणगाव-०, यावल-४, एरंडोल-२०, जामनेर-६, रावेर-२०, पारोळा-२, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-४ आणि बोदवड-१४, इतर जिल्ह्यातील २ असे एकुण १५८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *