भुसवळ –
शहरात शुक्रवार, दि. ४ जून रोजी पाच ते साडे पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.
जवळपास अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही वेळ दिलासा मिळाला.
शहरात शुक्रवारी दुपार पासून अती उष्णतेमुळे उकाडा जाणवत होता दुपार नंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले व त्यानंतर पावसाने हजेरी लावली. काही वेळानंतर पावसाचा जोर कमी झाला. यानंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.



