वरणगाव –
येथील अक्सा नगर भागातील प्रभाग क्रमांक सात व आठच्या मधून गेलेला रिंग रोडचा कामामुळे रोडची उंची वाढल्याने विजतारा खाली लोंबकळत होत्या. याबाबतचे निवेदन शिवसेनेतर्फे कनिष्ठ अभियंता महावितरण वरणगाव शहर व नगरपरिषद वरणगाव यांना देण्यात आले होते आणि त्यांच्याशी चर्चा करून सदरचा प्रश्न तात्काळ सोडवणे बाबत कळविण्यात आले होते.
शिवसेनेतर्फे दिलेल्या निवेदनाची दखल महावितरणे त्वरीत घेवून आज सोमवार रोजी अक्सा नगरातील खाली आलेल्या तारा उंच करण्याचे काम सुरु केले.
दोन दिवसापूर्वी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हा संघटक विलास मुळे अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी स्थानिक कार्यकर्ते शेख अजहर ,शेख बुढण ,सईद पिंजारी ,पवार राहुल, वंजारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता पाटील यांनी कार्यतत्परता दाखवून सदर काम करणे बाबत त्वरित लाईनमन बावणे यांच्यासोबत चर्चा करून काम करणे बाबतचे आदेश दिले. त्यानुसार आज दिनांक 31 मे 2021 रोजी महावितरण तर्फे संबंधित तारा रोडच्या दोन्ही बाजूच्या खांबांवर एक्सटेन्शन लावून तारा उंच करण्यात आल्या व ताणून व्यवस्थित बसवण्यात आल्या. यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले व शिवसेनेतर्फे महावितरणचे कनिष्ठ अभियंता पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे बऱ्याच वर्षापासून रखडलेले हे काम बऱ्याच वेळा विनंती अर्ज विनवण्या करून संबंधित महावितरण व नगर परिषदेमार्फत पूर्ण केले गेले नव्हते स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी स्वतः लक्ष घालून सदरचे काम मार्गी लावून दिले व पूर्ण करून दिले याबाबत नागरिकांनी शिवसेनेचे आभार व्यक्त केले आहे. यावेळी उपजिल्हा संघटक विलास मुळे अल्पसंख्यांकाच्या उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी स्थानिक कार्यकर्ते शेख अजहर शेख बुढण शेख असिफ भंगारवाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष संतोष माळी खान कमर मास्टर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.



