लहान मुलांसाठी सुपर स्पेशालीटी बेड निर्माण करा; भुसावळ शहर शिवसेनेची मागणी –

लहान मुलांसाठी सुपर स्पेशालीटी बेड निर्माण करा; भुसावळ शहर शिवसेनेची मागणी
भुसावळ (प्रतिनिधी )-

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव लहान मुलांना हाेण्याची शक्यता असून, त्यांच्यासाठी सुपर स्पेशालीटी बेड ग्रामीण रुग्णालयात राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी भुसावळ शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी केली आहे. ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी डॉ.मयूर चौधरी, डॉ. विक्रांत सोनार यांच्याशी चर्चा करतांना त्यांनी अनेक विषय मांडले.

अातापर्यंत काेराेनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ४५ वयांपेक्षा रुग्णांना बाधा व मृत्यू झाले. मात्र अाता त्यापेक्षा कमी वयाचे बाधित व मृत्युमुखी पडत अाहेत. या तिसऱ्या लाटेत १८ वर्षांपेक्षा कमी असलेल्या युवक, बालकांना विषाणूचे संक्रमण हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाय याेजना करणे आवश्यक आहेत.
या विषयांवर केली चर्चा
१) केंद्रात ० ते १ या वयाेगटातील नवजात बालकांसाठी २० खाटा राखीव ठेवण्यात याव्यात.
२) नवजात बालकांसाेबत मातेला स्तनपानसाठी केंद्रावर वेगळा कक्ष असावा.
३) काेराेनाबाधित बालक व युवकांवर उपचाराची एकच पद्धत असावी आणि डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांना त्यानुसार प्रशिक्षितही करण्यात यावे.
४) बालराेग व इतर तज्ज्ञांचा तातडीने टास्क फाेर्सचे गठण करण्यात यावे.
५) संक्रमित बालकांसाठी सकस आहाराची व्यवस्था करण्यात यावी.

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव मुलांना हाेण्याची शक्यता असून, या अनुषंगाने उपाय याेजनांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे असे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *