वरणगाव –
वरणगाव शहरातील अक्सा नगर भागातील लटकणाऱ्या तारा त्वरित दुरुस्त करण्यात याव्या अशी मागणी केली असून याबाबत कनिष्ठ अभियंता महावितरण व नगर परिषद यांना शिवसेनेतर्फे आज शनिवार रोजी निवेदन देण्यात आले .
वरणगाव शहरात बऱ्याच ठिकाणी विशेषतः अक्सा नगर भागात इलेक्ट्रिक तारा एकदमच खाली आल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत येणार्या जाणार्या वाहनांना तारा लागतात त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे ही बाब तेथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्याने आज शिवसेनेतर्फे कनिष्ठ अभियंता महावितरण वरणगाव शहर व स्ट्रीट लाईट चे खांब असल्याने नगरपरिषद वरणगाव यांना निवेदन देण्यात आले . वरणगाव शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत होणेबाबत कनिष्ठ अभियंता श्री पाटील यांच्याशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली .
या निवेदनात म्हटले आहे की वरणगाव शहरातील अक्सा नगर भागातील प्रभाग क्रमांक सात व आठ त्यामधील जो मोठा रिंग रोड केला आहे त्या रोडला क्रॉस करणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन च्या तारा रस्त्याचे काम झाल्याने रस्ता उंच झाल्याने खाली आलेले आहेत आता वादळाची परिस्थिती असल्याने व वाहनांना ये-जा करताना त्या तारा वर लागतात या तारांमुळे यापूर्वी अनेक लहान-मोठे अपघात झालेले आहेत व मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यांना तिथे सहज पद्धतीने तीन फुटापर्यंत वर करणे शक्य आहे तरी या तारा त्वरित पोलच्या वरच्या भागाला ब्रॅकेट लावून शिफ्ट कराव्या व येथील नागरिकांना दिलासा द्यावा सदरची बाब मी महावितरणचे अक्सा नगर भागाचे कर्मचारी व नगरपरिषद वरणगाव दिवाबत्ती विभागाचे कर्मचारी यांच्या लक्षात आणून दिलेली असून त्यांना सदर काम पूर्ततेबाबत करिता त्वरित आदेश करावे प्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन सुपर जिल्हा संघटक विलास मुळे अल्पसंख्यांकाचे उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी उपतालुकाप्रमुख श सुभाष चौधरी अझरुद्दीन शकूर विकास पवार सईद पिंजारी राहुल बावणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनावर वरील सर्वांच्या सह्या आहेत



