पुष्पक एक्सप्रेसच्या वेगामुळेच चांदणी रेल्वे स्थानकाचा दर्शनी भाग कोसळल्याचे निष्पन्न ; सुदैवाने प्रवासी नसल्याने टळली जीवीतहानी : सिग्नल अ‍ॅड टेलिकॉम यंत्रणा ठप्प ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर-नेपानगर या दोन्ही स्थानकाच्या मध्ये असलेल्या चांदणी या लहान रेल्वे स्थानकावर असलेली दोन मजली इमारतीचा काही भाग बुधवारी दुपारी 3.55 वाजता कोसळला होता मात्र या घटने मागील कारण आता स्पष्ट झाले असून ताशी 110 किलोमीटर वेगाने धावणार्‍या पुष्पक एक्स्प्रेस जाताच स्थानकाचा दर्शनी भाग कोसळल्याची बाब समोर आली आहे.
एखादी रेल्वे गेल्यानंतर रेल्वे स्थानकाचा दर्शनी भाग कोसळल्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे. विशेष म्हणजे या स्थानकावरील इमारतीची निर्मिती दर्जेदार पद्धत्तीने झाली नसल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला आहे. या घटनेनंतर आऊटरवर चार रेल्वे गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. तसेच या घटनेमुळे 40 हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ईमारतीचा भाग कोसळल्याने सिग्नल अ‍ॅड टेलिकॉम यंत्रणा ठप्प पडली आहे. रेल्वे स्थानकावरील ही मुख्य इमारतीतत स्टेशन मास्तर यांचे कार्यालय, तिकीट खिडकी, सिग्नल अ‍ॅड टेलिकॉम विभागाचे कार्यालय आदी कार्यालये आहे. एडीआरएम मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ अभियंता (समन्वय) राजेश चिखले यांनी चांदणी रेल्वे स्थानकावर जाऊन भेट देत पाहणी केली. ही इमारत 2004 मध्ये बांधण्यात आल्याचे सांगण्यात आले. इमारतीचा काही भाग कोसळल्याने त्यांचा परीणाम सिग्नल यंत्रणेवर झाल्याने त्याची दुरुस्ती सुरू आहे. कोसळलेला भाग दुरुस्त केला जाईल, असे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी सांगीतले असून रेल्वे वाहतुकीवर याचा कुठलाही परीणाम झाला नसल्याची माहिती दिली.
एएसएम प्रदीप कुमार बचावले
ताशी 110 वेगाने पुष्पक आल्यानंतर आल्यानंतर हिरवी झेंडी दाखवण्यासाठी इमारतीबाहेर आलेले एएसएम प्रदीपकुमार यांना इमारतीचा दर्शनी भाग कोसळताना दिसताच ते बाजूला झाले अन्यथा ते जखमी झाले असते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *