जळगाव –
जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण सख्या नियंत्रणात येऊ लागली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहे. आज जिल्ह्यात दिवसभरात २२१ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ३३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.गेल्या २४ तासात ७ जणांचा मृत्यू झाला.

आज आढळून आलेल्या रुग्ण संख्येनंतर जिल्ह्यात एकूण बधिताचा आकडा १ लाख ३९ हजार १३७ वर गेला आहे. त्यापैकी १ लाख ३० हजार ०५७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सद्यस्थितीला ६ हजार ५७० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. तर गेल्या २४ तासात ७ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २५१० वर गेला आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-३३, जळगाव ग्रामीण-१३, भुसावळ-४, अमळनेर-८, चोपडा-५, पाचोरा-१, भडगाव-५, धरणगाव-१, यावल-१९, एरंडोल-३, जामनेर-३६, रावेर-२३, पारोळा-५


