मुंबई –
कोविड -१९च्या दुस-या लाटे दरम्यान मध्य रेल्वेच्या समर्पित टीम ने चोवीस तास कार्यरत राहून दि. २१.५.२०२१ रोजी उपनगरी आणि मेल एक्स्प्रेस सेवांमध्ये १००% अचूकपणा साध्य केला आहे. सन २०२०-२१ मध्ये मध्य रेल्वेने मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या बाबत ९५.५% व उपनगरी ट्रेनबाबत ९४.४% अचूकपणा गाठला तसेच एप्रिल २०२१ मध्ये मेल/एक्स्प्रेस गाड्या ९६.९% आणि उपनगरी ट्रेन ९७.५% अचूकपणे चालल्या.
मालवाहतूक, पार्सल, ऑक्सिजन गाड्या चालविण्याशिवाय मध्य रेल्वेने लॉकडाउन व अनलॉक कालावधी दरम्यान मान्सूनपूर्व उपक्रम आणि देखभालीचे निरंतर विविध उपक्रम राबविले आहेत. त्याच वेळी मध्य रेल्वे ट्रेनचा वक्तशीरपणा ही अधिका अधिक चांगला राखत आहे.
कोविड १९ साथीचा आजार सर्व देशभर पसरलेला असताना कोविड-१९ संबंधित सर्व प्रोटोकॉलचे अनुसरण करीत मध्य रेल्वेच्या समर्पित कर्मचार्यांनी फील्ड असो वा ऑफिस सर्वत्रच रेल्वेच्या साधनसंपत्तीची देखभाल राखण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत



