भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील साकेगाव नजीक महामार्गावर धावत्या ट्रकचे चाक अचानक निखळले व समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना २३ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव जवळ भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या सिमेंटच्या ट्रक (एमएच १५ एफव्ही ९९९४) चे मागचे टायर अचानक निखळले यावेळी साकेगाव येथील बादल गोकुळ पवार हा तरूण दुचाकीने साकेगावकडून भुसावळकडे जात असतनांना त्याच्या दुचाकीवर अचानक ट्रकचे चाक येवून धडकले. या अपघातात तरूण गंभीर जखमी झाला जखमी बादल पवार या
तरूणास तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत .



