भुसावळ (प्रतिनिधी )-
लग्नाला नकार दिल्याने संशयित त्रास देत असल्याने त्यास वैतागून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी मयत तरुणीच्या नातेवाईक यांनी तक्रार दिल्यावरुन संशयित आरोपी
नारायण अशाेककुमार ठारवानी याचे विरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात शनिवार रोजी
गुन्हा दाखल करण्यात आला. सदर तरुण हा झिरो पोलीस असल्याचे समजते .
शहरातील सिंधी काॅलनीतील रहिवासी हर्षलीन हीचे नारायण साेबत प्रेमसंबंध हाेते, मात्र हर्षलिनने आरोपी साेबत लग्नाला नकार दिल्याने ताे हर्षलिनला त्रास देत हाेताच व माेबाईलवर धमकीचे संदेश देत हाेता. या सर्व प्रकाराला कंटाळून हर्षलिन हीने 8 मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नारायण हा धमकी देऊन त्रास देत हाेता, अशी माहिती मृत्यू पूर्वी हर्षलिनने तिच्या अाईला दिली हाेती, मी विवाहास नकार दिल्याने ताे त्रास देताे असे तिने आईला सांगितले होते या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याने आरोपी विरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
मंजू साेढाइ यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली. सहा.पाेलिस निरीक्षक अनिल माेरे, समाधान पाटील पुढील तपास करीत आहे.



