धरणगाव –
तालुक्यातील भोद येथील धरणगाव एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष यांनी पत्नी व मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी व मुलगी यांच्यासही शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलावरून तापीनदीत उडी घेतल्याचे माहिती प्राप्त होत आहे. 2 दिवसांपासून त्यांची गाडी पुलावर बेवारस स्थिथित ऊभी होती .

भोद येथील राजेंद्र रायभान पाटील वय-54, पत्नी सौ.वंदनाबाई राजेंद्र पाटील वय-48, मुलगी म्यॉनल राजेंद्र पाटील वय-21 हे तिघ जण टाटा इंडीका MH-19.P.A-1094 गाडीने दि.17 मे रोजी सकाळी अमळनेर तालुक्यातील भरवस या सासरवाडीच्या गावाला गेले होते. येथे उत्तराकार्याचा कार्यक्रम असल्याने राजेंद्र पाटील पत्नी व मुलीसह सासरवाडीला आले होते. दुपारी 3.30 वाजेच्या जळवळपास ते घरी भोद येथे येण्यासाठी निघाले मात्र, ते भोदला पोहचलेच नाही. दरम्यान सायंकाळी 6 वाजेनंतर त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावानजीक तापी नदीवर असलेल्या पुलावर लागलेली दिसली. दि. 18 दुपारी 4 वाजता राजेंद्र पाटील यांचे प्रेत नदीत तरंगतांना दिसल्यानंतर परिसरात खळबळ निर्माण झाली. रात्री उशिरा राजेंद्र पाटील यांच्या मुलीचा मृतदेह सुध्दा तरंगतांना दिसला. दरम्यान, राजेंद्र पाटील यांच्या पत्नीचा शोध घेतला जात होता. भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील हे घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्यात सहभागी झाले असून.त्यांचे सोबत गुलाब बाबा पाटील व भोद येथील सरपंच राजेंद्र पाटील हे देखील आहेत. शेतकी संघाचे माजी अध्यक्ष रमेश पवार व पणन संघाचे संचालक संजय पवार यांनी दुख व्यक्त केले आहे.


