चोपडा –
चोपडा येथील पाटील गढी येथे अवैध गुटखा साठा असल्याचे माहिती वरुन शहर पोलिसांनी
छापा टाकला असता या प्रकरणी साडेचार लाखााचा गुटखा व मुद्देमालासह मुख्य सुत्रधारासह अन्य दोघांना अटक केल्याने अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे .
शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाटील गढी येथील रमाकांत बाबुराव मराठे याच्याकडे छापा टाकला असता त्याच्याकडे रु.९१,५२०/-चा विमल पान मसाला व सुगंधित तंबाखु आढळला असून तो जप्त करण्यात आला. या प्रकरणी राहुल विश्वास गुजराथी रा. हुंडिवाले गल्ली,चोपडा या मुख्य सुत्रधारास ताब्यात घेण्यात आले .
मच्छी मार्केट परिसरात उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप एमएच १९ बिए ५३८७ हे वाहन ताब्यात घेऊन तपासले असता त्यामध्ये विमल,शिमला,आरएमडी सहित एकुण २१ प्रकारचा पानमसाला व सुगंधित तंबाखु असा रु. ३,५८,१५०/- चा माल मिळुन आला व वाहनचालक शाम बडगुजर यांची विचारपुस केली असता सदरचा माल राहुल गुजराथी याचा असल्याचे सांगितले.सदर गुन्ह्यात ४,४९,४०० रु.चा माल व रु.४,००,०००/- किंमतीचे पिकअप वाहन असा एकुण रु. ८,४९,४०० /- चा मुद्देमाल जप्त व तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींवर भाग ५ गुरनं. १८८/२०२१ भादवि कलम ३२८,२७२,२७३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण,पोहेकॉं. अंबादास सैंदाणे, पोलीस नाईक विलेश सोनवणे,संतोष पारधी,प्रदिप राजपुत,ज्ञानेश्वर जवागे,शेषराव तोरे, वेलचंद पवार,महिला पोहेकॉं रत्नमाला शिरसाठ ,पोलीस काँस्टेबल संदिप भोई , रविंद्र पाटील यांनी केली.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक शेषराव तोरे यांच्याकडे आहे .



