भुसावळात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; १,१९,१००/-रुपये दंड वसूल ; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे..


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोणाच्या पार्श्वभूमिवर वाढत्या कोरोना विषाणूवर आळा
घालण्याकरिता जिल्हधिकारी यांनी १ जून २०२१ पर्यंत
कडक निर्बधासह लॉकडाउन वाढविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांना व भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी ७ ते ११ वाजे पर्यंत दुकाने उघडण्याची मुभा आहे मात्र ११ वाजे नंतर शहरात विनाकारण फिरणारे तसेच दुकानें उघडे ठेवून नियमांचे उल्लंघन क़रणाऱ्यां विरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे .
या अनुषंघाने सोमवार रोजी शहरात बाजारपेठ पोलिस स्टेशन भाग,यावल नाका,जामनेर रोड, रज़ा टॉवर, आणि फेकरी टोल नाका असे पांच ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करुन
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर व मास्क न लावणाऱ्या विरुद्धजिल्हधिकारी यांचे आदेशांचे व लॉकडाउन उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस प्रशासन व नगरपालिका
वसूली पथक यांनी १७ रोजी कार्यवाही केली.
या कारवाई दरम्यान काही ठिकाणी लोकांनी पोलिसांसोबत वाद सुद्धा घातले , काही लोकांनी राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची ओळख दाखवली मात्र पोलिसांनी कोणासही न जुमानता लॉकडाउनचे उल्लंघन क़रणाऱ्यांवर कारवाई करीत सुमारे २५६ जणांवर कारवाई करीत ६८८००/- दंड वसूल केला तसेच रिक्षा चालकांवर मोटरवाहन कायदा १७७ नुसार ९२ केसेस , व १८४००/-दंड ,
अन्य मोटार वाहन कायदा केसेस -२६४ केसेस , ३१९००/- दंड
भादवी १८८ नुसार – ११ गुन्हे दाखल करण्यात आले . तसेच यावेळी १८८ जणांच्यारॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली . यात एकही बाधीत रुग्ण आढळले नाही .
ही कार्यवाही यापुढे देखील अशीच सुरु राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही , तरी नागरिकांनी महत्वपूर्ण कामा करीताच घराबाहेर पडावे व नियमांचे पालन करावे ,असे आवाहन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *