प्रवाशांच्या अल्प कमी प्रतिसादामुळे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – नागपुर , लोकमान्य टिळक टर्मिनन्स – हबीबगंज या गाड्या रद्द ; तर गुजरातमधील चक्रीवादळामुळे डाऊन ओखा -पुरी रद्द ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे रेल्वेने खालील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल पुढे दिलेल्यानुसार:
1) ट्रेन नंबर 02169 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – नागपुर दैनिक विशेष यात्रा आरंभ दि. 20.5.2021 पासून आणि ट्रेन नंबर 02170 नागपुर -छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष यात्रा आरंभ दि 19.5.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
2) ट्रेन नंबर 02153 लोकमान्य टिळक टर्मिनन्सह बीबगंज साप्ताहिक विशेष यात्रा आरंभ दि 27.5.2021 पासून आणि ट्रेन नंबर 02154 हबीबगंज -लोकमान्य तिलक टर्मिनस साप्ताहिक विशेष यात्रा आरंभ दि 28.5.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
तसेच
3) रेल्वे द्वारा गुजरात मधील चक्रवादळाच्या सतर्कतेमुळे ट्रेन नंबर 08402 डाऊन ओखा -पुरी विशेष यात्रा आरंभ दि 19.5.2021 ला रद्द करण्यात आली आहे .प्रवाश्यानी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *