मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे आणि दानापूर दरम्यान २ पूर्णतः आरक्षित उन्हाळी विशेष ट्रेन विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिलेल्यानुसार :

पुणे – दानापूर विशेष
01493 विशेष अतिजलद पुणे येथून दि. १२.५.२०२१ रोजी २१.३० वाजता सुटेल व दानापूर येथे तिसर्या दिवशी ०४.४० वाजता पोहोचेल.
01494 विशेष दानापूर येथून दि. १४.५.२०२१ रोजी ०७.०० वाजता सुटेल व पुण्याला दुसर्या दिवशी १६.२० वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी जं., पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा.
संरचना : २० द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण : 01493 या पूर्णतः आरक्षित असलेल्या विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. १२.५.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


