भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील लिम्पस क्लब रिक्षा स्टॉप जवळ वॉल कंपाउंड मध्ये मोकळ्या जागी एका इसमाचा मृतदेह रात्रीच्या सुमारास पडलेला आढलुन आला घटनेचे वृत्त समजताच पोलीस अधिकारी व पथकाने घटनास्थळी पोहचले .खून कोणी व का केला याबाबत पोलिस तपास सुरु आहे .
भुसावळ शहरातील लिम्पस क्लब रिक्षा स्टॉप जवळ मोकळ्या जागेत अंदाजे रात्रीच्या १.३० वाजेच्या सुमारास एका इसमाचेे दगडाने तोंड ठेचून खून केल्याचा प्रकार झाल्याचे दिसून आले.दगडाने चहेरा छीन्नविचिन्न झाल्याने मयताची ओळख पटत नव्हती मात्र बघ्यांच्या गर्दीतील एकाने मयतास ओळखले असता मयत हा संदीप एकनाथ गायकवाड राहणार संत नगर ध्यान केंद्र जवळ भुसावळ हाअसून मयताच्या उजव्या हातावर एस गोदलेले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चाँडक,शहर पोलीस स्टेशनचे बाबासाहेब ठोंबे,पोकॉ संकेत झांबरे,पोकॉ.ईश्वर भालेराव,विकास सातदिवे,कृष्णा देशमुख,बंटी कापडने तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी कसून तपास करीत आहेत.
नेमकी घटना कशामुळे झाली याबाबत पोलिस तपास करीत आहे .



