भुसावळात रेल्वेचे इंजिन रुळावरून घसरले.

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील मध्य रेल्वे आर आर आय गुड्स केबिन जवळ डाऊन लाइनला डीजल इंजन 14815R हे जुने इलेक्ट्रिकल इंजिन क्रमांक 23083हे टोचन करून अपसाईड सी एन डब्ल्यू यार्ड मध्ये जात असतांना इलेक्ट्रिकल खांबा क्रमांक 443/3074N येथे डिझेल रेल्वे इंजिन रुळावरुन उतरले.
ही घटना आज शनिवार 10 रोजी संध्याकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी घडलेली आहे. या घटना यार्डमध्ये घडल्या कारणाने मुख्य मेन लाईन येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवासी गाड्या वर काही फरक पडलेला नाही तसेच रेल्वेचे या घटनेमुळे जास्त प्रमाणात नुकसान झालेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *