साकेगाव ग्रामपंचायतीची सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन टप्पा दोन योजनेसाठी निवड व ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न;

भुसावळ (प्रतिनिधी )-

साकेगाव ग्रामपंचायतीची सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन टप्पा दोन योजनेसाठी निवड वऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला . गावातील संपूर्णपणे अंडरग्राउंड गटारी ,गावात वाहून जाणारे पाणी पूर्णपणे एकत्रीकरण करणे, त्या पाण्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्धीकरण करणे त्या पाण्याचा उपयोग गावातील शेतकऱ्यांसाठी व व्यवसायासाठी उपयुक्त तसेच गावातील गोळा होणारा घनकचरा व त्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणे असा प्रोजेक्ट साकेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून लवकरच सर्व ग्रामस्थांना बघायला मिळेल ही योजना स्मार्ट व्हिलेज साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून उत्कृष्टरित्या राबवून विभागीय स्तरावर मॉडेल ठरेल अशा पद्धतीचा व्यवस्थापन साकेगाव ग्रामपंचायत प्रशासन करणार आहे अशी खात्री प्रशासनाला आज रोजी आपण दिलेली आहे ऑनलाइन प्रशिक्षणासाठी उपसरपंच आनंद ठाकरे ग्राम विकास अधिकारी खैरनार सरपंच प्रति विष्णू कोळी,समस्त अंगणवाडी सेविका आदींची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *