मुंबई –
१. मुंबई-गोरखपूर स्पेशल –
01053 विशेष दि. १३.४.२०२१ आणि २०.४.२०२१ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.४० वाजता सुटेल व गोरखपूरला तिसर्या दिवशी ०२.०० वाजता पोहोचेल.
01054 विशेष दि. १५.४.२०२१ व २२.४. २०२१ रोजी गोरखपूरहून १६.०५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे २३.४५ वाजता पोहोचेल.

थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, वाराणसी, मऊ, बेलथारा रोड, भटनी, देवरिया सदर.
संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ३ द्वितीय आसन श्रेणी.
२. पुणे-दानापूर विशेष
01401 अतिजलद विशेष दि. ९.४.२०२१, ११.४.२०२१, १६.४.२०२१ आणि १८.४. २०२१ रोजी पुणे येथून १६.१५ वाजता सुटेल व दानापूरला दुसर्या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
01402 विशेष दि. ११.४.२०२१, १३.४.२०२१, १८.४.२०२१ आणि २०.४.२०२१ रोजी ०४.०० वाजता दानापूर येथून सुटेल आणि पुण्याला दुसर्या दिवशी १२.०५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा.
संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.
३. मुंबई-पाटणा विशेष
01091 अतिजलद विशेष दि. १२.४.२०२१, १५.४.२०२१ व १९.४.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.०५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी १४.३० वाजता पाटणा येथे पोहोचेल.
01092 विशेष दि. १३.४.२०२१, १६.४.२०२१ व २०.४.२०२१ रोजी पाटणा येथून १६.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी २३.३० वाजता पोहोचेल.
थांबे : दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा.
संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ७ द्वितीय आसन श्रेणी.
४. मुंबई-गोरखपूर विशेष
01093 विशेष दि. ७.४.२०२१, १२.४.२०२१, १४.४.२०२१ व १९.४.२०११ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.३० वाजता सुटेल आणि गोरखपूरला तिसर्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल.
01094 अतिजलद विशेष दि. ९.४.२०२१, १४.४.२०२१, १६.४.२०२१ व २१.४.२०११ रोजी गोरखपूर येथून १७.२५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसर्या दिवशी ००.०५ वाजता पोहोचेल.
थांबे : दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, कानपूर, लखनऊ, गोंडा, बस्ती
संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ७ द्वितीय आसन श्रेणी.
५. मुंबई- दरभंगा अतिजलद विशेष
01097 अतिजलद विशेष दि. १२.४.२०२१ आणि १९.४.२०२१ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८.०५ वाजता सुटेल व दरभंगा येथे दुसर्या दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.
01098 अतिजलद विशेष दि. १३.४.२०२१ व २०.४.२०२१ रोजी दरभंगा येथून १९.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्या दिवशी ०५.१० वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, इगतपुरी (केवळ 01097 साठी), नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर.
संरचना : २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ८ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण : 01093 व 01401 पूर्णत: आरक्षित विशेष ट्रेनचे बुकिंग दि. ७.४.२०२१ रोजी उघडेल आणि 01053, 01091, आणि 01097 या विशेष ट्रेन्सचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. ८.४.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
सदर प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.


