भुसावळ ( प्रतिनिधी )-

नुकतेच आम आदमी पार्टी दिल्लीचा आमदार अमानतुल्लाह खान याने संत श्री नरसिंह नंद सरस्वती यांची जीभ आणि गळा कापून टाकण्याची खुली धमकी संत श्री नरसिंह नंद सरस्वती यांना देऊन माझं कोणी काहीच बोलू शकणार नाही असं वादग्रस्त विधान करून भारतीय कायद्याला संविधानाला चालेंज करणाऱ्या या जिहादी मानसिकतेच्या आम आदमी पार्टी दिल्लीच्या या अमानतुल्लाह खान याचा आम्ही राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद जळगाव जिल्हा जाहीर निषेध व्यक्त करतो. या आमदाराच्या या धमकीमुळे संत श्री नरसिंह नंद सरस्वती यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्या करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शिशिर जावळे महासचिव चंद्रशेखर पाटील, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्यामकांत जाधव, जळगाव जिल्हा कार्यकारणी सदस्य नरेंद्र बऱ्हाटे यांनी जळगाव जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत तसेच भुसावळ प्रांताधिकारी सुलाने यांच्याकडे मागणी केली असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
……..


