जळगाव –
जळगाव येथील पोलीस लाईनमध्ये राहत्या घरात किचनमध्ये अडकलेल्या १८ महिन्याच्या बालकाला अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढल्याची घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. या कामगिरीबद्दल अग्निशमन विभागाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
या बाबत वृत्त असे की जळगाव येथील पोलीस मुख्यालयात शिपाई म्हणून कार्यरत तथा पोलीस लाईनमधील रहिवासी पो कॉ अरूण विश्वनाथ पाटील कुटुंबियासह राहतात. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अरूण पाटील याचा १८ महिन्याचा मुलगा स्वयंम पाटिल हा खेळत खेळत घरात किचनमध्ये गेला असता त्याने आतून कडी लावली व अडकला. हा प्रकार लगेच त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरीत परिसरातील नागरीकांना बोलावले. प्रसांगवधान राखून नागरीकांनी क्षणाचाही विलंब न करता, अग्निशमन अपत्कालिन विभागाच्या पथकाशी संपर्क साधला. असता तात्काळ अग्निशमन पथक पोलीस लाईनच्या बिल्डिंग १४४ जवळ दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी हायड्रोलिक टॅम्बो स्टूल आणि डोअर ब्रेकरच्या सहाय्याने चिमुकल्याला कोणतीही इजा न करता सुखरूप बाहेर काढले. यावेळी बालकाच्या आईसह सर्वानी सुटकेचा श्वास सोडला व अग्निशमन दलाच्या कामगिरिचे कौतुक करीत आभार व्यक्त केले.
अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी सुनिल मोरे यांच्या मार्गदर्शना खाली वाहन चालक देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटिल यांनी ही यशस्वी कौतुकास्पद कामगिरी केली.



