जळगाव –
जिल्ह्यात एकाच दिवशी शनिवारी एक हजार 224 रुग्णांनी मात केली असलीतरी 24 तासात मात्र पुन्हा 1194 रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 15 रुणांचा मूत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1668 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 92 हजार 421 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 79 हजार 180 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शनिवारी एकाच दिवसात 1224 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
शनिवारी आढळलेले बाधीत
जळगाव शहर 232
जळगाव ग्रामीण 26
भुसावळ 36
अमळनेर 107
चोपडा 200
पाचोरा 42
भडगाव 34
धरणगाव 90
यावल 22
एरंडोल 42
जामनेर 89
रावेर 13
पारोळा 17
चाळीसगाव 51
मुक्ताईनगर 73
बोदवड 08
अन्य जिल्हा 12



