मुंबई –
कोरोनाचा उद्रेक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लादण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर या शहरांमध्ये कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे या शहरांसाठी कठोर नियमांची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण परीस्थितीची सविस्तर माहिती प्रत्येकाकडून जाणून घेतली असून राज्याच्या सचिवांना त्यांनी योग्य ते आदेश दिले आहेत, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.



