मुंबई ते पुरी, हावडा दरम्यान अतिरिक्त विशेष रेल्वे गाडया धावणार ; प्रवाशांना मिळाला वाढीव गाड्यांमुळे दिलासा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-

कोविडच्या काळात रेल्वे प्रशासनाने मुंबई ते पुरी व हावड्याच्या दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. या गाड्यांमध्येही कोविडच्या नियमांचे पालन करुन आरक्षीत तिकिटावरच प्रवास करता येणार आहे.
एलटीटी-पुरी साप्ताहिक एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी अतिजलद साप्ताहिक 02145 डाऊन गाडी 11 एप्रिल 2011 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 8 वाजून 35 वाजता सुटेल व पुरी येथे तिस-या दिवशी सकाळी 06.55 वाजता पोहोचेल. 02146 अप विशेष गाडी 13 एप्रिलपासून पासून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रत्येक मंगळवारी पुरी येथून रात्री 9. 45 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 07.25 वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खारियार रोड, कांताबंजी, टिटलागड, बालांगीर, बारगाह रोड, संबलपूर, अंगुल, तालचेर, ढेंकनाल, कटक, भुवनेश्वर आणि खुर्दा रोड येथे थांबे असतील. लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा सुपरफास्ट द्वि-साप्ताहिक 01051 डाऊन गाडी 8 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर बुधवार आणि गुरुवारी रात्री 7 .35 वाजता सुटेल आणि हावडा येथे तिसर्या दिवशी सकाळी 6.45 वाजता पोहोचेल. 01052 अप विशेष गाडी 10 एप्रिल पासून दर शुक्रवार व शनिवारी हावडा येथून रात्री आठ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्या दिवशी सकाळी 5.30 वाजता पोहोचेल. या कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, राजनंदगाव, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, पुरुलिया, आद्रा, बांकुरा, मिदनापूर, खडगपूर आणि संत्रागाची येथे थांबे असतील. दोन्ही गाड्यांमध्ये 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी, 2 द्वितीय वातानुकूलित, 6 तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 2 द्वितीय आसन श्रेणी आणि एक पेंट्री कार असे कोच असतील. या गाडीतून केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *