भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ येथे गुडस यार्डसमोर आरओएच डेपोच्या मागील परिसरात भंगार सामानाला शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास अचानक आग लागली . सुदैवाने जीवित हानी टळली.
जवळच २१ बोग्यांमध्ये ७०० टन कापूस लोड केलेला होता. आगीची ठिणगी उडाली असती तर मोठे नुकसान झाले असते. मात्र ते टळले.
या आगीमुळे अप-डाउनच्या रेल्वेवर कोणताही परिणाम नाही. तासाभरात ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले.



