भुसावळ (प्रतिनिधी ) –
मकर संक्रांती निमित्त रथ सप्तमी दरम्यान सौभाग्याचे लेणे म्हणून महीलांचा हळदी कुंकू समारंभ सर्वत्र सुरु असतो यानिमित्त सहसा तीळगुळ व वाण म्हणून भेट वस्तू दिले जाते . परंतु
सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था, भुसावळ तर्फे एक नविन उपक्रम आदिवासी पाड्यावरील महीलांसाठी राबवण्यात आला यानिमित्त
भिलमळी आदिवासी पाड्यावरील महीलांसाठी राबवला, यात मासिकपाळी दरम्यान आपली स्वच्छता व काळजी कशी घ्यावी व सॅनेटरी पॅडचा वापर का करावा , तसेच महिलांनी परिवारा सोबतच स्वतःची सुध्दा काळजी घेणे गरजेचे आहे याबाबत थोडक्यात महत्वपूर्ण माहिती संस्थापक अध्यक्षा राजश्री नेवे यांनी दिली . यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क , सँनीटायझर, व डिस्टनसिंगसह नियमांचे पालन करण्यात आले . प्रसंगी
राजश्री नेवे, मंदाकिनी केदारे, स्मिता माहुरकर, प्रिती अांबादे यांनी पाडयातील शेकडो महिलांना डिस्टनसिंग सांभाळत सॅनेटरी नॅपकीन वाटप केले.



