भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ पंचायत समितीच्या सभापती मनीषा पाटील व उपसभापती वंदना उन्हाळे यांनी राजीनामा दिल्याने मंगळवारी नवीन पदाधिकार्यांची निवड झाली. सभापदी पदावर वंदना सदानंद उन्हाळे यांची तर उपसभापती पदी प्रीती मुकेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. आमदार संजय सावकारे यांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार केला.

पदाधिकार्यांची बिनविरोध निवड
नवीन सभापती आणि उपसभापती निवडीसाठी मंगळवारी विशेष बैठकीचे आयोजन तहसीलदार दीपक धीवरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सकाळी 10 वाजेपासून निवडीची प्रक्रीया सुरू झाली. सभापतीपदी वंदना उन्हाळे तर उपसभापती प्रीती पाटील यांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे दुपारी तीन वाजता तहसीलदार धीवरे यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी माजी उपसभापती गोलू पाटील, राजेंद्र चौधरी, चुडामण भोळे, प्रशांत पाटील, सुधाकर जावळे, भैय्या महाजन, सुनील महाजन, देवीदास सावळे, भाजप तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी सभापती मनीषा पाटील, राजेंद्र चौधरी, रवी पाटील उपस्थित होते.


