भुसावळ (प्रतिनिधी )
शहरातील जामनेर रोड ते नाहाटा चौफुली,खडका चौफुली ते रजा टॉवर या भागात बाजारपे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक पेट्रोलिंग करीत असतांना रस्त्याच्या कडेला विना नंबर फॅन्सी आठ मोटरसायकली मिळून आल्याने त्या मोटरसायकल पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा केल्या आहेत.तसेच मोटरसायकल मालकांना कागदपत्र घेऊन आणण्यास सूचना दिल्या व फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्यांना त्वरित नंबर प्लेट बदलण्यास सांगितले.
विना नंबरप्लेट मोटरसायकल वाहन चालकांवर होणार कारवाई–
भुसावळ शहरात गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी विना नंबरप्लेटची मोटरसायकल वापर करीत असून महिलांचे मंगळसूत्र,चोरी,घडफोडी, दरोडे यासारखे गुन्हे घडत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी दररोज विना नंबरप्लेटची मोटरसायकल वाहन चालकांवर कारवाई केली जाणार आहे कारवाईस सामोरे जायचे नसेल तर आपल्या मोटरसायकलींवर नबंर प्लेट लावणे अनिवार्य आहे.जेणे करून याचा फायदा शहरातील नागरीकांसह वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी होणार आहे.जर एखाद्या परिसरात कुठली घटना घडल्यास ताबडतोब गुन्हेगारांचा मोटरसायकल नबंर टिपता येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय भदाणे,आयज सैय्यद,पोना दिपक पाटील,उमेश पाटील,रमण सुरळकर, पोकॉ ईश्वर भालेराव, योगेश महाजन,जीवन कापडे,विकास सातदिवे,प्रशांत परदेशी,कृष्णा देशमुख,योगेश माळी अशांनी मिळून केली.


