अट्रावलच्या प्रसिद्ध मुंजोबा देवस्थानाची यात्रा रद्द -; दुकाने लावण्यास मनाई ;


यावल : तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबा देवस्थानाची यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.
यावल येथील तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला
कोरोनामुळे यात्रा रद्द
राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मुंजोबा देवस्थानाची पुढील सालाबादप्रमाणे होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लावलेल्या निर्बंधामुळे रद्द करण्यात आली. यात्रोत्सवानिमित्त देव दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यासह मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातुन लाखो भाविक दर्शनासाठी येतात शिवाय नवसाला पावणारा मुंजोबा अशी मंदीराची ख्याती असल्याने नवस देण्यासाठी भाविक महत्वाचे असे शनिवार व सोमवार हे दोन मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी इतर दिवशी देखील दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंजोबा यात्रोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले
यात्रोत्सवानिमित्त आकाश पाळणे, लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने, महिलांसाठी मिळणारी संसारोपयोगी कटलरी वस्तुंची दुकाने, लाकडी तसेच इतर साहित्याची दुकाने, नाश्त्यासाठी असलेली हॉटेल्स, थंडपेय विक्रीची दुकाने यांना परवानगी दिली जाणार नाही. कोणी विना परवानगी दुकाने टाकतांना आढळल्यास त्यावर संचारबंदी नियमांचे उल्लंघण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. नागरीकांनी याची काळजीपुर्वक खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी केले.
या बैठकीला उपनिरीक्षक ए.आर.पठाण, पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले तसेच देवस्थानाचे विश्वस्त पदधिकारी ललित कोळी, दीपक तायडे, प्रभाकर कोळी, अनिल कोळी, जनार्दन कोळी, विक्रम कोळी व अट्रावल पोलिस पाटील पवन चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *