–
जळगाव –
राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे जळगाव जिल्हा दौर्यावर येत आहेत. मंगळवार, 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता मोटारीने औरंगाबाद येथून चाळीसगावकडे प्रयाण ते करतील. सकाळी 10.30 ते 12.00 वाजता चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक ते घेणार आहेत.

11 रोजी पाडळसरे प्रकल्पाला भेट
गुरुवार, 11 फेब्रुवारी,2021 रोजी सकाळी 10.45 वाजता शिरपूर येथून पाडळसरे, ता.अमळनेर प्रकल्पाला भेट, सकाळी 11.30 ते 12 वाजता पाडळसरे, ता. अमळनेर येथे आगमन व निम्न तापी प्रकल्प भेट, जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांसमवेत चर्चा, दुपारी 12 ते 12.45 वाजता अमळनेर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक, दुपारी 12.45 ते 2.00 वाजता पाडळसरे, ता. अमळनेर येथे राष्ट्रवादी परीवार संवाद, दुपारी 2.00 वाजता पाडळसरे येथून अमळनेरकडे प्रयाण, दुपारी 2.15 ते 3.00 वाजता अमळनेर येथे आगमन व राखीव, दुपारी तीन वाजता अमळनेर येथून पारोळ्याकडे प्रयाण, दुपारी 3.30 मि.नी पारोळा येथे आगम, दुपारी 3.30 ते 4.15 एरंडोल विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, दुपारी 4.15 वाजता पारोळा येथून पाचोर्याकडे प्रयाण, सायकांळी 5.30 ते 6.15 वाजता पाचोरा येथे आगमन व पाचोरा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, सायंकाळी 6.15 वाजता पाचोरा येथून जामनेरकडे प्रयाण, 7.30 ते 8.5 जामनेर येथे आगमन व जामनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, रात्री 8.15 वाजता जामनेर येथून जळगावकडे प्रयाण, रात्री 9.15 जळगाव येथे आगमन व मुक्काम ते करतील.


