पुणे विभागात डीसीएन कामासाठी विशेष ब्लॉक; भुसावळ विभागातून धावणाऱ्या चार गाड्यांच्या वाहतुकीत बदल; काही गाड्या हडपसरपर्यंतच

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे यार्ड तसेच पुणे–दौंड सेक्शनमधील विद्यमान लेआउटमध्ये बदल करण्यासाठी डीसीएन कार्य हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

या ब्लॉकमुळे काही गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येणार असून, एका गाडीचे ओरिजिनेशन पुणे स्थानकाऐवजी हडपसर येथून करण्यात येणार आहे.

हडपसर येथे शॉर्ट टर्मिनेशन होणाऱ्या गाड्या :

गाडी क्रमांक १२१३६ नागपूर–पुणे एक्सप्रेस — १२ सप्टेंबर २०२६ रोजी नागपूर येथून सुटणारी गाडी हडपसर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.

गाडी क्रमांक ११४०६ अमरावती–पुणे एक्सप्रेस — १२ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावती येथून सुटणारी गाडी हडपसर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. यात 

गाडी क्रमांक ११०७८ जम्मूतवी–पुणे एक्सप्रेस — ११ सप्टेंबर २०२६ रोजी जम्मूतवी येथून सुटणारी गाडी हडपसर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.


पुणे–नागपूर एक्सप्रेसच्या सुटण्याच्या स्थानकात बदल :

गाडी क्रमांक १२१३५ पुणे–नागपूर एक्सप्रेस ही १३ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे स्थानकाऐवजी हडपसर स्थानकातून सायंकाळी ५.४५ वाजता सुटेल.

रेल्वेच्या पायाभूत सुविधांची देखभाल, विद्यमान रेल्वे लेआउटमध्ये आवश्यक बदल तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे देखभाल व अभियांत्रिकी काम आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या बदलामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.