भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील फातेमा कॉलनीत सोमवारी पहाटे घटना उघडकीस आली. कुटुंबीय परिवारासोबत लग्नासाठी बाहेरगावी गेल्याने बंद असलेले घर चोरट्यांनी फोडून सव्वादोन लाखांची रोकड व ५३ ग्रॅम सोने व चांदीचे दागिने असा एकूण ६ लाखांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

फातेमा कॉलनी, प्लॉट क्र.४३ मधील रहिवासी तथा जळगावच्या मैन एरिगेशनमध्ये अभियंता नसलेले वसीम शेख हे २८ मार्च रोजी नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. यामुळे घर बंद होते. ही संधी चोरट्यांनी साधली. व कुटूंब सोमवार (दि.३०) रोजी पहाटे घरी आल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला व घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त आढळले, लोखंडी कपाटाचे लॉकर उघडे मुख्य दरवाजाचा दिसले. यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. पहाटे बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी पाहणी केली.
हा मुद्देमाल लांबवला
शेख यांच्या घरातून ८ ग्रॅम वजनाच व ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, ९ ग्रॅम वजनाच्या क ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बाळ्या, तीन ग्रॅम वजन व १५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, २० ग्रॅम वजनाच्या व लाख रुपये किमतीच्या अंगठ्या, सात ग्रॅम वजनाची ३५ हजार रुपय किंमतीची सोन्याची अंगठी, दोन किमतीच्या नाकातील फुल्या, च ग्रॅम वजनाच्या व दहा हजार रुपये ग्रॅम वजनाचे २० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, चांदीचे २० वजनाचे व २० हजार रुपये किंमत क्वॉइन, शंभर ग्रॅम वजनाचे व हजार रुपये किंमतीचे चांदीचे पान व सव्वा दोन लाखांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लांबवला.


