रद्द झालेल्या गाड्या पूर्ववत – शालीमार व ज्ञानेश्वरी एक्सप्रेस सेवा पुन्हा सुरू :

भुसावळ (प्रतिनिधी) –

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील गोंदिया स्थानकावरील कामांमुळे काही एक्सप्रेस गाड्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या होत्या. प्रवाशांच्या सोयीचा विचार करून या रद्द केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. संबंधित गाड्या त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार पुन्हा धावतील. तपशील पुढीलप्रमाणे –

  • गाडी क्रमांक 18030 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक 4 एप्रिल ते 24 एप्रिल 2026 या कालावधीत रद्द केलेली गाडी शालीमार येथून नियोजित वेळेनुसार धावेल.
  • गाडी क्रमांक 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार एक्सप्रेस दिनांक 6 एप्रिल ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत रद्द केलेली गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नियोजित वेळेनुसार धावेल.
  • गाडी क्रमांक 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार ज्ञानेश्वरी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी 4, 5, 7, 8, 11, 12, 14, 15, 18, 19, 21 व 22 एप्रिल 2026 या कालावधीत रद्द केलेली गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नियोजित वेळेनुसार धावेल.
  • गाडी क्रमांक 12102 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी 6, 7, 9, 10, 13, 14, 16, 17, 20, 21, 23 व 24 एप्रिल 2026 या कालावधीत रद्द केलेली गाडी शालीमार येथून नियोजित वेळेनुसार धावेल.

प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी तसेच प्रवाशांनी गाड्यांची अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत चौकशी क्रमांक १३९, ‘रेलवन’ किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाचा उपयोग करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.