भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 12 व 13 मार्च 2026 रोजी “टेक्नोत्सव 2025–26” हा उपक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष . मोहन फालक, चेअरमन . महेश फालक आणि खजिनदार संजय नाहाटा यांच्या हस्ते झाले.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी, उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील, टेक्नोत्सव संयोजक प्रा. हर्षल पाटील, डॉ. स्वाती फालक आणि प्रा. स्मिता बेंडाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्मिता बेंडाळे यांनी केले. प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी विद्यार्थ्यांना टेक्नोत्सवचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मोहनभाऊ फालक यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. ममता पाटील यांनी केले.
टेक्नोत्सव अंतर्गत हॅकेथॉन, पोस्टर प्रेझेंटेशन, क्विझ स्पर्धा, ट्रेझर हंट, फूड अँड फन फेस्ट, डान्स, सिंगिंग व फॅशन शो अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांचे नियोजन विद्यार्थ्यांनी केले असून त्यामागील उद्देश विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे हा होता. या कार्यक्रमासाठी सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे :
फूड अँड फन फेस्ट :
प्रथम – पलक चौरसिया, आरती भोई, सलोनी चंदन
द्वितीय – भूमी ओचानी, अलिशा खिल्लारे, चेतना बारी, मानसी तलरेजा, फिरदोस
तृतीय – सुजाता इंगळे, निकिता सपकाळे, प्रेरणा सपकाळे, अदिती भोळे
पोस्टर प्रेझेंटेशन (UG) :
प्रथम – मोहिनी कोल्हे
द्वितीय – अक्षरा काळकर
तृतीय – संकेत वारके व मंथन लोंढे
पोस्टर प्रेझेंटेशन (PG) :
प्रथम – उन्नती कोतवाल
द्वितीय – जयश्री पाटील
हॅकेथॉन (UG) :
प्रथम – योगेश जावळे व अभिजीत झांबरे
द्वितीय – वैदेही ठाकूर व मानसी कोलते
हॅकेथॉन (PG) :
प्रथम – उन्नती कोतवाल व राजेंद्र बडगुजर
फोटोग्राफी :
प्रथम – शिराज खान
द्वितीय – प्रणय गुरुचल
तृतीय – सौमित्र बाविस्कर
डान्स स्पर्धा :
प्रथम – श्रुती बारी
द्वितीय – हर्षा तायडे
तृतीय – वैष्णवी कोळी
ट्रेझर हंट :
प्रथम – प्रथमेश व ग्रुप
द्वितीय – पलक चौरसिया व ग्रुप
तृतीय – इशा सपकाळे व ग्रुप
सिंगिंग स्पर्धा :
प्रथम – विक्रांत बिराडे
द्वितीय – देवार्पण भौमिक
तृतीय – राखी अवस्थी
क्विझ स्पर्धा :
प्रथम – कशिश सिंग, अंश तायडे
द्वितीय – भूमिका लोखंडे, मिताली पाटील
तृतीय – निकिता शुगनी, कीर्तिका मेघे
फॅशन शो :
किंग – प्रणय गुरुचल
क्वीन – लक्षवरिया मल्होत्रा
द्वितीय – अक्षय चंद्रत व राधिका शर्मा
तृतीय – साक्षी मटकरी
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक सचिव डॉ. पुनम महाजन, डॉ. सपना जंगले, प्रा. स्वाती शेळके, प्रा. अर्चना भालेराव तसेच इव्हेंट कोऑर्डिनेटर म्हणून प्रा. मेघा चौधरी, प्रा. नंदिनी दायमा, प्रा. एकता बजाज, प्रा. अरवा भारमल व प्रा. नयना चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून डॉ. रश्मी शर्मा, डॉ. शलाका निकम, डॉ. विद्या पाटील, डॉ. उमेश फेगडे, डॉ. मनोज जाधव, उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील आणि डॉ. ममताबेन पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमातील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी आणि प्राध्यापकांच्या हस्ते करण्यात आले



