बोदवड (प्रतिनिधी ) – येथील रांका विद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मंजुलताजी प्रकाशचंदजी सुराणा होत्या.

यावेळी सौ. वैशालीताई अजयजी जैन, सौ. सुजाताई विकासजी कोटेचा, सौ. शिल्पाताई विजयकुमारजी जैन, सौ. कांताताई अशोकजी जैन, सौ. अर्चनाताई आनंदजी जैस्वाल, सौ. शोभाताई रविंद्र माटे, सौ. कांतादेवी रमेशजी जैन, सौ. प्राजक्ताताई प्रमोद पाटील, सौ. अनिताताई अरविंद चौधरी, नगरसेविका सौ. सीमाताई प्रशांत नरवाडे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. पाटील, उपमुख्याध्यापिका एम. एस. बडगुजर, उपप्राचार्य एम. टी. नेमाडे, पर्यवेक्षक आर. के. तायडे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. संजय निकम, एन. यू. बागुल यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व अध्यक्षीय सूचना डॉ. संजय निकम यांनी मांडल्या, तर अनुमोदन एन. यू. बागुल यांनी दिले. मान्यवरांचा सत्कार समारंभ झाल्यानंतर विद्यालयातील महिला शिक्षिकांचा नगरसेविका सौ. सीमाताई नरवाडे यांनी ट्रॉफी देऊन सन्मान केला.
यानंतर २६ जानेवारी रोजी आयोजित कलाविष्कार स्पर्धेतील पारितोषिक वितरण करण्यात आले. लेझीम पथक, डंबेल्स, एनसीसी, आरएसपी, स्काऊट-गाईड आदी पथकांतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मुख्याध्यापक पी. एम. पाटील यांनी आपल्या मनोगतात महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांना समाजात सन्मान व समानतेची वागणूक देणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी सौ. वैशालीताई जैन व सौ. प्राजक्ताताई पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात सौ. मंजुलताजी सुराणा यांनी भारताला राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांसारख्या महान स्त्रियांची गौरवशाली परंपरा लाभल्याचे सांगितले. त्यांच्या आदर्शातून आजच्या महिलांनी पत्नी, माता, भगिनी, सखी व शिक्षिका अशा विविध भूमिका समर्थपणे पार पाडाव्यात, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली भुसारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जया मगरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता अमोल नाईक यांनी सादर केलेल्या वंदे मातरम् या गीताने झाली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एनसीसी विभाग प्रमुख एस. आर. सावळे, आरएसपी प्रमुख रवींद्र उघडे, निता पाटील, स्काऊट-गाईड विभागाचे व्ही. एस. काळबैले, जगदीश बडगुजर, जी. डी. चौधरी, व्ही. आर. पाटील, एस. पी. कोंगे, मनीषा मांडळकर तसेच लेझीम पथक प्रमुख एन. यू. बागुल, जे. के. पाटील, मनीषा मांडळकर, अंकित बोरसे, वेरूळकर मॅडम, जयस्वाल मॅडम, चोपडे मॅडम, फाटे मॅडम, मनोरे, भूषण भोई, महेंद्र पंडित, पी. बी. नरवाडे, एस. आर. पाटील, सचिन सत्रे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


