भुसावळात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महिलांची उत्साही मशाल यात्रा

भुसावळ (प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भुसावळ यांच्या वतीने महिलांची भव्य मशाल यात्रा उत्साहात काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थीनी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून टाकला.

“जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी घेतलेली भूमिका आणि त्यांचा आदर्श समाजासमोर ठेवण्याचा संदेश या यात्रेतून देण्यात आला.

यात्रेची सुरुवात अष्टभुजा मंदिर येथून करण्यात आली. त्यानंतर शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत यात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे करण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

या वेळी भुसावळ नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलेजा नारखेडे, प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनी सावकारे, संगीता बियाणी, शहरमंत्री गायत्री पाटील, शहराध्यक्षा स्मिता बेंडाळे, जिल्हा सहसंयोजक वैष्णवी कोळी तसेच समाजातील अनेक प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमामुळे भुसावळ शहरात शिवजयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.