भुसावळ ( प्रतिनिधी)– हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रिंसीपल नीना कटलर यांनी दिपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केली. सातवी इयत्तेचा विद्यार्थी निनाद चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगितली, तर इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनी विधिका शंकपाल यांनी पोवाडा गायला.
यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले, तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे व अफजलखान यांच्या जीवनावर आधारित नाटक सादर केले. कार्यक्रमाचा एक विशेष ठळक भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात विद्यार्थ्याला घोड्यावर बसवून शाळेच्या परिसरात मिरवणूक काढली गेली, ज्यामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला.

प्रिंसीपल नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्या मनप्रीत कौर, श्रद्धाली घुले, सोनाली मुजुमदार, स्मिता जाधव, अर्जुन सनस, सोनिया टेकवाणी, मोहम्मद अकीब, जेम्स फ्रांन्सीस, युवराज जाधव, अनघा पाटील आणि मुकेश कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन माया सोनोने व शितल बुला यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रिंसीपल नीना कटलर यांनी सर्व सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे शिवजयंती उत्सव रंगतदार ठरला.



