भुसावळ (प्रतिनिधी )-: ८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त महिला क्रीडा मंडळ भुसावळ तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “स्मार्ट फोनची साथ की सावट?” हा स्पर्धेचा विषय असून सहभागींसाठी २०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

स्पर्धेची अंतिम तारीख ५ मार्च असून विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यार्थिनी व महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी यांनी केले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी प्रभा पाटील (९९२३६३१७७०), विजया निकम (९४०३९८८५४५) तसेच कीरण चौधरी (७०२०९१४३५६) यांच्याशी संपर्क साधावा, असे सचिव लता होसकोने यांनी कळविले आहे.


