भुसावळ (प्रतिनिधी) - प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेद्वारे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते अमरावती दरम्यान विशेष एकेरी गाडी चालविण्यात येणार आहेत. विवरण पुढीलप्रमाणे - गाडी क्रमांक ०११५५ एकेरी विशेष दिनांक १८.०६.२०२६ आणि १९.०६.२०२६ रोजी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी अमरावती येथे १२.३० वाजता पोहोचेल. (०२ सेवा) थांबे -दादर , ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा. संरचना: २ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन. आरक्षण - ०११५५ एकेरी विशेष दिनांक १७.०६.२०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.



