भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे हजरत ख्वाजा न्यामतुल्ला शाहवली सरकार यांच्या संदल सोहळ्याचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुका येथील फुलगाव येथे छोटी उजनी दरगाह शरिक मध्ये हजरत ख्वाजा न्यामतुल्ला शाहवली सरकार यांच्या संदल सोहळ्याचे आयोजन गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे.

या निमित्ताने दरगाह येथे दुपारी २ ते ६ या वेळेत भव्य संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ६ ते ९ या वेळेत भाविकांसाठी लंगर (प्रसाद) वाटप आयोजित करण्यात आले आहे. तसेच या धार्मिक कार्यक्रमानिमित्त प्रसिद्ध कव्वाल शमा मौफील
यांच्या शानदार कव्वाली कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संदल सोहळ्यात परिसरासह सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पीर साहेब महावीर फकीर
यांनी केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संदल सोहळा भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.